प्रति,
संचालक, शिक्षण संचालनालय, पुणे सहसंचालक / उपसंचालक, शिक्षण विभाग (सर्व) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व)
विषयः शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) बाबतची माहिती लिंकमध्ये भरण्यास मुदतवाढ देणेबाबत...
उपरोक्त संदर्भ क्र. १ नुसार सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे स्वयं-मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्या maa.ac.in या वेबसाईटवरील SQAAF टॅबवर https://scert-data.web.app/ या नावाने स्वयं-मूल्यांकनासाठीची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामध्ये दि. २८.०२.२०२५ पर्यंत माहिती भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याविषयी कळवले होते व संदर्भ क्र. २ नुसार स्वयं-मूल्यांकनासाठीची माहिती भरण्यासाठी १५.०३.२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि, आजतागायत १००% शाळांची माहिती पूर्ण झालेली दिसून येत नाही. त्यामुळे, स्वयं-मूल्यांकनाबाबत माहिती भरण्यासाठी दि. ३१.०३.२०२५ रोजी सायं. ०५:०० वाजेपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. यानंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही.
तरी, आपल्या विभागातील/जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांची माहिती विहित कालावधीत १००% पूर्ण करून घेण्यात यावी.
0 Comments