प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत प्रति दिन प्रति लाभार्थी दरामध्ये सुधारणा करणेबाबत.....
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत इ.१ ली ते इ.५ वी मधील प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिने युक्त तसेच, इ.६ वी ते इ.८ वी मधील उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात येतो. सदर योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून प्रतिदिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरविण्यात येतो.
केंद्र शासनाने दि.०७ ऑक्टोंबर, २०२२ रोजीच्या आदेशान्वये सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील दि.०१ ऑक्टोंबर, २०२२ पासून प्रति दिन प्रति लाभार्थी आहार खर्चाच्या दरात ९.६ टक्के वाढ करण्याचे निर्देश दिलेले होते. यानुसार संदर्भाधिन दि.१५ नोव्हेंबर, २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रति दिन प्रति लाभार्थी आहार खर्च मर्यादा प्राथमिक वर्गासाठी रु.५.४५ आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी रु.८.१७ याप्रमाणे निश्चित करण्यात आलेली होती. सद्यस्थितीत केंद्र शासनाने संदर्भाधिन दि.२७ नोव्हेंबर, २०२४ रोजीच्या आदेशान्वये प्रति दिन प्रति विद्यार्थी आहार खर्चात दरवाढ मंजूर केली आहे. त्यानुसार सदरप्रमाणे सुधारित दर लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
0 Comments