Subscribe Us

Header Ads

संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविणेबाबत



◼️ विषय : संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविणेबाबत....

उपरोक्त विषयान्वये STARS प्रकल्पामधील SIG-२ Improved Learning Assessment System नुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन १ व संकलित मूल्यमापन २ (PAT-१ ते ३) चे आयोजन करण्यात येणार आहे. उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) चे आयोजन दि. २२ ते २५ जुलै २०२४ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) घेण्यात आलेली आहे. सदर संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT -२) शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून

याबाबतच्या सविस्तर सूचना यापूर्वी यु-ट्युबद्वारे देण्यात आलेल्या आहेत. विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT -२) गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT -२ ) शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर संकलित चाचणी -१ (PAT -२) चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शिकाची लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.

१. संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) चाटबॉट मार्गदर्शिका लिंक -

https://bit.ly/PATUserManual

तसेच राज्यातील शिक्षकांना संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT -२) चे गुण PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणेकरिता जिल्ह्यांना दि. ११ नोव्हेंबर २०२४ ते २६ नोव्हेंबर २०२४ पर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे. करिता गुणनोंद लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.

२. संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) गुणांची नोंद करणेसाठी लिंक -

https://bit.ly/PAΤ-ΜΗ



Post a Comment

0 Comments