Subscribe Us

Header Ads

जिल्हा अंतर्गत बदली वेळापत्रक

 


विषय :- जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक

1.जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठीचे सुधारित धोरण दिनांक १८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार तसेच यापूर्वी शासनाने वेळोवेळी विहीत केलेल्या धोरणानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रीया ऑनलाईन पोर्टल द्वारे राबविण्यात येते.

२. मा. उच्च न्यायालय, नागपूर येथे दाखल अवमान याचिका क्र.२१६/२०२४ वरील दि.२५.१०.२०२४ रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान मा. उच्च न्यायालयाने बदल्यांसाठीचे ऑनलाईन पोर्टल हे संपूर्ण बदली प्रक्रीयेदरम्यान संपूर्ण राज्यासाठी विहीत वेळापत्रकानुसार कार्यान्वित (functional) असावे, असे निदेश दिलेले आहेत.

३. तद्नुषंगाने आपणांस असे कळविण्यात येते की, यापुढे दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रीयेसाठी सर्वसाधारणपणे संचमान्यतेची प्रक्रीया पूर्ण होऊन शाळांमधील शिक्षकांची संख्या निश्चित झाल्यानंतर, संबंधित जिल्हा परिषदेने ऑनलाईन बदली प्रक्रियेसाठी आवश्यक माहितीची पूर्वतयारी करण्याची प्रक्रिया सुरु करावी. तसेच जिल्हा परिषदेने अवघड क्षेत्र घोषित अथवा घोषित क्षेत्र प्रसिध्द करण्याची कार्यवाही करावी.


CLICK HERE 

Post a Comment

0 Comments