Subscribe Us

Header Ads

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२४-२५


 १. योजनेची उद्दिष्ट :-

a) इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करणे.

b) विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत करणे.

c) विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकसित होऊन त्या विद्यार्थ्यांकडून आपली विद्याशाखा व राष्ट्र यांची सेवा घडावी.

२. परीक्षेचे स्वरुप :- केंद्रशासनामार्फत (शिक्षण मंत्रालय (MoE), भारत सरकार, नवी दिल्ली) २००७-०८ पासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा इ. ८ वी साठी सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्यासाठी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत जिल्हयातील विविध केंद्रावर दिनांक २२ डिसेंबर, २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास दर महा रु. १०००/- (वार्षिक रु. १२०००/-) शिष्यवृत्ती दिली जाते.

३. पात्रता :-

a) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी / विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते.

b) पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न ३,५०,०००/- पेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापनाप्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा / तलाठयांचा सन २०२३-२४ च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवावा.

c) विद्यार्थी/विद्यार्थीनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. (अनुसूचीत जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) चा विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.)

सविस्तर माहिती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇 

CLICK HERE 

Post a Comment

0 Comments