Subscribe Us

Header Ads

टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची कार्यपध्दती


 निवडणूक संचालन नियम, १९६१ च्या नियम १८ नुसार टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करणाऱ्या व्यक्तिंचे प्रवर्ग निश्चित करण्यात आले असून त्यानुसार निवडणूक कर्तव्यार्थ नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना ही सुविधा उपलब्ध आहे. सदर नियमातील नियम २० (१) नुसार निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त मतदाराला टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करावयाचे असल्यास संबंधित मतदारास संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे मतदानाच्या किमान ०७ दिवस आधी प्रपत्र-१२ मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे व त्या नंतर संबंधित निवडणूक अधिकारी यांच्याकडून पडताळणी करुन संबंधित मतदाराला टपाली मतपत्रिका देण्यात येते.

उपरोक्त नियमांमध्ये दि.२३.०८.२०२३ रोजी नियम १८-ए नव्याने अंतर्भूत करण्यात आला असून वरील प्रयोजनार्थ प्रपत्र-१२ मध्ये अर्ज केलेल्या निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त कर्मचाऱ्याने मतदानाकरिता उभारण्यात आलेल्या सुविधा केंद्रामध्ये मतदान करणे आवश्यक आहे. पोस्टाद्वारे मतपत्रिका पाठविण्याची पद्धत बंद करण्यात आलेली आहे. भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या दि.३१.१०.२०२३ च्या पत्रान्वये लोकसभा/विधानसभा सार्वत्रिक निवडणूकांकरिता टपाली मतपत्रिकेद्वारे करावयाच्या मतदाना संदर्भात सविस्तर सूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यामध्ये परि. १४ मध्ये निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त मतदाराच्या मतदाना संदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूका-२०२४ मध्ये राज्यात पाच टप्यामध्ये मतदान घेण्यात आले. त्या वेळी सुविधा केंद्राद्वारे मतदान केलेल्या अन्य विधानसभा मतदार संघांच्या मतदारांच्या टपाली मतपत्रिकांची आदानप्रदान करण्याच्या संदर्भात अनेक अडचणी आल्या होत्या. काही टप्प्यांमध्ये संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या त्या मतदार संघांसाठी केंद्रीय समन्वय केंद्र (Centralized Clearing Centres) विभागस्तरावर केली होती व त्या द्वारे अर्ज तसेच टपाली मतपत्रिकांचे आदानप्रदान करण्यात आले होते. विधानसभा सार्वत्रिक निवडणूका-२०२४ कमी टप्प्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात मतदार असलेल्या मात्र निवडणूक कर्तव्यार्थ अन्य मतदार संघात नियुक्ती दिलेल्या कर्मचाऱ्यांकडून टपाली मतपत्रिकेसाठी प्रपत्र-१२ भरुन देण्याची शक्यता असल्याने निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या टपाली मतपत्रिकांची संख्या जास्त प्रमाणात असण्याची शक्यता आहे.

सविस्तर माहिती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇 

CLICK HERE 

Post a Comment

0 Comments