विषय :- प्रतिकुल हवामान तसेच वादळी वाऱ्यासह पावसाच्या अनुषंगाने उपाय योजना करण्याबाबत.
उपरोक्त विषयान्वये संदर्भ-1 च्या पत्रानुसार हवामान खात्याच्या अंदाजानुसार वीजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याअनुषंगाने संदर्भ -2 नुसार दिनांक 24.12.2024 रोजी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या आढावा बैठकमध्ये उपाय योजना करण्याबाबत निर्देश देण्यात आले. तसेच संदर्भ-3 अन्वये दिनांक 24.12.2024 रोजी प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांच्यकडून प्रसारीत करण्यात आलेल्या पुर्वानुमान हवामान विषयक अंदाजा नुसार दिनांक 27.12.2024 ते 28.12.2024 या दरम्यानच्या कालावधीत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्याअनुषंगाने आपणास सुचित करण्यात येते की, आपल्या विभागाशी संबंधीत वादळी वाऱ्यांपासून तसेच वीजांच्या गडगडाटापासून उपाययोजनेबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात याव्या तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी/कर्मचारी यांना मुख्यालयी उपस्थित राहणेबाबत सुचना देण्यात याव्या तसेच प्रादेशिक हवामान विभाग यांच्याकडून वेळीवेळी प्राप्त होणाऱ्या हवामानविषयक सुचनांनुसार नागरिकांना सतर्क राहणेबाबत स्थानिक प्रसार माध्यमातून अवगत कराण्यात यावे.
0 Comments