◼️ शासन परिपत्रक:
वित्त विभागाच्या दिनांक ३०/०५/२०२४ रोजीच्या परिपत्रकामध्ये उक्त लाभ अनुज्ञेय करण्याबाबतची जी सविस्तर कार्यपद्धती नमूद करण्यात आली आहे, ती कार्यपद्धती त्यामधील नमूद अटी व शर्तीसह परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य असणारा राज्यातील जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त खाजगी १००% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याबाबतीत अनुसरण्यात यावी.
याअनुषंगाने वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू राहतील. सदर आदेश अंमलात आणण्याबाबत आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी उचित कार्यवाही करावी.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२४०९२३१४५७४४४०२१ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
सदर शासन निर्णय वाचण्यासाठी व pdf स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇
0 Comments