◼️मराठवाडा मुक्ती संग्राम दिन
दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो, आणि हा दिवस मराठवाड्याच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मराठवाडा भाग जो 1948 पर्यंत हैदराबादच्या निजामाच्या राज्यात होता, त्या वेळी निजामाने भारतात विलिनीकरणाला विरोध केला होता. त्यामुळे मराठवाडा हा भाग भारतात समाविष्ट होऊ शकला नव्हता. हैदराबादचा शेवटचा निजाम मीर उस्मान अली खान होता. तो सातवा आणि शेवटचा निजाम म्हणून ओळखला जातो. मीर उस्मान अली खान याने 1911 ते 1948 पर्यंत राज्य केले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्याने हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यास नकार दिला होता
1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैदराबादचे निजाम भारतात सामील होण्यास तयार नव्हते, आणि त्यांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अनेक मराठवाड्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी निजामाच्या सैन्याशी संघर्ष केला आणि भारतात समाविष्ट होण्यासाठी लढा दिला. या लढ्याला "मराठवाडा मुक्ती संग्राम" म्हणतात. भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी "ऑपरेशन पोलो" ही लष्करी कारवाई केली, ज्याद्वारे निजामाचा पराभव करण्यात आला आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद राज्य भारतात सामील झाले. त्यानंतर मराठवाडा भागाचा भारतात समावेश झाला आणि लोकांनी निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्ती मिळवली. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ 17 सप्टेंबर हा दिवस "मराठवाडा मुक्ती संग्राम दिन" म्हणून साजरा केला जातो.
0 Comments